पिनाका पॉड महत्त्वाचा संरक्षण प्रकल्प - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

By admin | Published: July 9, 2017 01:00 PM2017-07-09T13:00:09+5:302017-07-09T13:00:09+5:30

- भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत सुरू करण्यात आलेला पिनाका पॉड प्रकल्प (मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिम) अत्यंत महत्त्वाचा आहे

Important Protective Project for Pinaka Pod - Minister of State for Defense Subhash Bhamre | पिनाका पॉड महत्त्वाचा संरक्षण प्रकल्प - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

पिनाका पॉड महत्त्वाचा संरक्षण प्रकल्प - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

Next

 ऑनलाईन लोकमत

 
भुसावळ, जळगाव, दि.9 - भुसावळ  ऑर्डनन्स फॅक्टरीत सुरू करण्यात आलेला पिनाका पॉड प्रकल्प (मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिम) अत्यंत महत्त्वाचा आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी रात्री येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
त्यांच्या हस्ते पिनाका पॉड व अत्याधुनिक स्वयंचलित पावडर कोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे.  त्यांनी या आधी वरणगाव फॅक्टरीला भेट दिली. नंतर भुसावळ फॅक्टरीतील प्रकल्पांचे उद्घाटन केले. संरक्षण राज्यमंत्री म्हणून व खान्देशचा भूमिपुत्र म्हणून उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. भामरे यांनी सांगितले की कामगारांमध्ये कोर आणि नॉनकोर आयटमबाबतचा प्रश्न आहे. देशात एकूण 41 ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. त्यातून 600 प्रकारचे  उत्पादन होते. यातील 143 आयटम नॉनकोरमध्ये आहेत. नॉन कोरमध्ये  बूूट, कपडे आदी आयटम आहेत.
खरी क्षमता शस्त्रास्त्र निर्मितीत
फॅक्टरीची खरी क्षमता शस्त्रात्र निर्मितीत आहे. विशेष करून लघू क्षेपणास्त्र टँक आदींमध्ये आहे.
एकही फॅक्टरी बंद होणार नाही
सध्या खासगीकरणाबाबत चर्चा आहे, मात्र देशातील एकही फॅक्टरी बंद होणार नाही. एकाही कर्मचा:याची नोकरी जाणार नाही. किंवा कोणत्याही कर्मचा:याची बदली होणार नाही.या शब्दात त्यांनी कर्मचा:यांच्या मनातील भीती घालवली. असे असले तरी या सर्व बाबींना अजून भरपूर वेळ आहे. 2022 मध्ये काही बदल होतील. उत्पादन हलवले तरी स्थानिक लोकांना रोजगार  दिला जाईल. 
याप्रसंगी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे सदस्य  एस.के. चौरसिया, भुसावळ आर्डनन्स फॅक्टरीचे सरव्यवस्थापक आर.एस. ठाकूर, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष उदय वाघ व्यासपीठावर होते.
 

Web Title: Important Protective Project for Pinaka Pod - Minister of State for Defense Subhash Bhamre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.