मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:42 PM2018-12-13T22:42:40+5:302018-12-13T22:44:01+5:30

राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ

Improve last year's mistake and send proper persons to training | मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

googlenewsNext
ठळक मुद्दे पानी फाऊंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठी कार्यशाळा चित्रफितीने भारावले उपस्थित मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठा

जळगाव: दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मागील वर्षी केले त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून, अधिक जोमाने काम करा. जिल्ह्यात मागील वर्षी जी चूक झाली ती सुधारून यंदा अधिक दर्जेदार व या कामाची मनापासून आवड असलेल्यांनाच प्रशिक्षणासाठी पाठवा, असे आवाहन आमिरखानच्या पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी केले. या स्पर्धेंतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा गुरूवार, १३ डिसेंबर रोजी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी संभाजी ठाकूर, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, नाशिक जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले.
चित्रफितीने भारावले उपस्थित
यावेळी दुष्काळाशी दोन हात ही १७ मिनिटांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी कशा पद्धतीने आपसातील वाद, मतभेद मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना कसे यश मिळाले, हे दाखविण्यात आले. ते पाहून या कार्यशाळेला उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ भारावले.
मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठा
पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक गायकवाड यांनी मागील वर्षी अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यांचा समावेश या योजनेत होता. त्याचा आढावा सादर केला. या दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे १०४ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. त्यातून सुमारे २ लाख टँकर भरले जाऊ शकतील. तसेच त्याची बाजारभावानुसार किंमत १० कोटी रूपये असेल असे सांगितले.
सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा बदला
डॉ.पोळ म्हणाले की, शिकून, ज्ञान घेऊन सरकारी खुर्चीत बसलेल्या अधिकाºयांकडे आपण जात नाही. कारण आपला सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे. मात्र आपण चांगल्या हेतूने गेलो तर यंत्रणा निश्चित मदत करते, हा माझा अनुभव आहे. माझी कोणतीही संस्था नाही. संत गाडगेबाबांचीही संस्था नव्हती. तरीही ते मंत्रालयात गेले तर मुख्यमंत्री उतरून खाली येत असत. ही त्यांच्या नैतिकतेची ताकद होती. दुर्देवाने ही ताकद निर्माण करण्यात आपण कमी पडतो. सरकारी यंत्रणेत खूप ताकद आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारी यंत्रणेतील अधिकारी मित्रमंडळींच्या मदतीमुळेच बिबळेवाडी या सातारा जिल्'ातील गावात अनेक अडथळे पार करून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, तसेच बायोगॅस युनिट उभारण्यात कसे यश मिळविले, याचा किस्सा उपस्थितांना ऐकविला.
स्पर्धेचे निकषही सुधारीत
डॉ.पोळ म्हणाले की, स्पर्धेचे निकषही यंदा सुधारीत केले आहेत. तसेच गेल्या वर्षी ७५ तालुक्यांचा समावेश होता. यंदा ७६ तालुक्यांचा समावेश केला आहे. केवळ जळगावसाठी हा बदल करून चाळीसगाव व जामनेर तालुक्यांचा समावेश केला  असल्याचे सांगितले.

Web Title: Improve last year's mistake and send proper persons to training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.