२०२२ मध्ये पावणे दोन कोटी नागरिकांना बसली उन्हाची झळ’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:22 PM2023-04-15T16:22:00+5:302023-04-15T16:22:30+5:30

 उष्माघाताची लक्षणे आढळल्यानंतर १५ जणांवर यशस्वी उपचार

In 2022 1 45 crore citizens got heat stroke jalgaon | २०२२ मध्ये पावणे दोन कोटी नागरिकांना बसली उन्हाची झळ’!

२०२२ मध्ये पावणे दोन कोटी नागरिकांना बसली उन्हाची झळ’!

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ कोटी ७५ लाख १० हजार ९३४ जणांना उन्हाची झळ बसली आहे.मार्च ते मे महिन्याच्या कालावधीतील या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये उन्हाचा चटका बसल्यानंतर या पावणे दोन कोटी जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

गुरुवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी यंदाच्या उन्हाळ्यासाठी काही उपायायोजना आखल्या आहेत. त्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.त्यावेळी त्यांनी २०१८ ते २०२२ दरम्यानची आकडेवारी सादर केली. त्यात  पावणे दोन कोटी नागरिकांना उन्हाच्या झळा बसल्याने त्यांचा ‘ताप’ वाढल्याचे निदान झाले होते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यासाठी ७७० आंत:रुग्ण खाटांची व्यवस्थेसह १५४ कोल्ड बेड उभारण्यात आले होते.

उष्माघातानंतर ५८ जणांवर उपचार
लक्षणे आढळून आल्यानंतर संबंधित रुग्णांना शासकीय रुग्णालयांमधील उष्माघात कक्षात दाखल करुन घेण्यात आले होते. त्यानुसार २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये १६ तर नंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाच्या लाटेमुळे उष्माघात कक्षाची सुविधा बंद करण्यात आली होती. तर २०२२ मध्ये १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील आहे, त्यामुळे खासगी रुग्णालयातही उष्माघाताचे अनेक रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

Web Title: In 2022 1 45 crore citizens got heat stroke jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.