मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघातात; पाच ठार, चार गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:37 AM2022-05-14T11:37:19+5:302022-05-14T11:39:44+5:30

गुजरातमधील वलसाड येथील वसुंधरा डेअरीचे दूध नागपूर येथे घेऊन जाणारा टँकर (क्र. जीजे ०२ व्हीव्ही ८८८७) हा गुरुवारी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) परिसरात नादुरुस्त झाला.

In accident near Muktainagar; Five killed, four seriously injured | मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघातात; पाच ठार, चार गंभीर

मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघातात; पाच ठार, चार गंभीर

Next

मुक्ताईनगर (जि.जळगाव) : दुधाने भरलेल्या नादुरुस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकले जात असताना त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने या टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात ५ जण ठार झाले, तर चार गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) लगत घडली.

मृतांमध्ये धुळ्याचे चार, तर जळगावातील एकाचा समावेश आहे. पवन सुदाम चौधरी (२५ रा. कॉटन मार्केटमागे, धुळे), धनराज बन्सीलाल पाटील (४१, रा. नगाव, धुळे), उमेश राजेंद्र सोळंके (३५, रा. देवपूर, धुळे), भालचंद्र गुलाब पाटील (३१, रा. भिवाडी, धुळे) आणि धनराज सुरेश सोनार (३७, रा. शिवाजीनगर, जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

गुजरातमधील वलसाड येथील वसुंधरा डेअरीचे दूध नागपूर येथे घेऊन जाणारा टँकर (क्र. जीजे ०२ व्हीव्ही ८८८७) हा गुरुवारी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) परिसरात नादुरुस्त झाला. त्यामुळे शुक्रवारी पहाटे या टँकरमधील दूध दुसऱ्या टँकरमध्ये टाकण्यात येत होते. दुसरीकडे नादुरुस्त टँकर घेऊन जाण्यासाठी त्याला टोइंग व्हॅनही जोडून ठेवण्यात आली होती. याचदरम्यान मागून मार्बल भरलेला ट्रक (क्र. जीजे ३६ व्ही ८९३९) भरधाव वेगाने आला आणि ट्रकने वरील तीनही वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, चारही अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यात दूध शिफ्टिंगसाठी डेअरीकडून पाठविण्यात आलेल्या पाच कर्मचाऱ्यांना आपला जीव गमावावा लागला.

अपघात झाल्यानंतर मार्बल भरलेल्या ट्रकचालकाने फरार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एका ढाब्यावर त्याला अटक केली. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.

Web Title: In accident near Muktainagar; Five killed, four seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात