जळगावात फटाका अंगावर पडल्याने बालकाच्या मानेवर भाजले
By विलास बारी | Published: November 12, 2023 08:46 PM2023-11-12T20:46:16+5:302023-11-12T20:47:12+5:30
या बालकावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.
जळगाव : घराच्या अंगणात उभ्या असलेल्या देवांश कमल प्रेमचंदाणी (वय ७ वर्षे, रा. सिंधी कॉलनी) या बालकाच्या अंगावर जळता फटाका पडल्याने त्याच्या मानेवर भाजले गेले. या बालकावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.
देवांश हा शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री सिंधी कॉलनीमध्ये घराच्या अंगणात उभा होता. त्यावेळी आजूबाजूला फटाके फोडले जात होते. कोणी तरी जळता फटाका फेकला व तो या बालकाच्या शर्टवर पडला. शर्ट जळाल्याने बालकाच्या मानेवर भाजले गेले. त्यानंतर रविवार, १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांनी या बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.