जळगावात मुख्यमंत्र्यांच्या नावे मागितली जातेय भीक; एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:48 PM2022-01-26T12:48:27+5:302022-01-26T12:48:43+5:30
गेल्या 80 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. परंतू विलीनीकरणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह 'भीक मांगो' आंदोलन सुरु केले आहे. भीक मागून जमा झालेली रक्कम राज्य सरकारला देण्यात येणार आहे.
गेल्या 80 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. परंतू विलीनीकरणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव एसटी आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलन केले.
एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी दुकानदार, पादचारी, वाहनधारक अशा सर्वांकडे भीक मागितली. अडीच ते तीन वर्ष वयाची मुलेही या आंदोलनात सहभागी झाले होते. भीक मागून जमा झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे.