जळगावात विसर्जन मिरवणुकीला गालबोट, महापौरांच्या घरावर दगडफेक
By सुनील पाटील | Updated: September 9, 2022 23:48 IST2022-09-09T23:47:56+5:302022-09-09T23:48:34+5:30
मिरवणूक थांबवली.

जळगावात विसर्जन मिरवणुकीला गालबोट, महापौरांच्या घरावर दगडफेक
जळगाव : शहरातील मेहरुणमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना रात्री पावणे अकरा वाजता घडली.
मेहरुण मधील 'एक गाव एक गणपती' व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात असताना एक गाव एक गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते जय श्रीराम मंडळाच्या मिरवणूक सहभागी झाले व त्यातील काही तरुणांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल व दगडफेक केली. यामुळे दोन गट समोरासमोर आले.
या घटनेला राजकीय वादाची किनार असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून मिरवणूक थांबवण्यात आली आहे. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महापौरांच्या घरासमोरच ही मिरवणूक थांबवण्यात आली आहे. या भागात तणाव निर्माण झाला आहे.