आजची शिक्षणव्यवस्था बुद्दीमत्ता मोजण्यास अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:32 PM2019-07-15T14:32:03+5:302019-07-15T14:33:10+5:30
डॉ़ श्रुती पानसे : डॉ.जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे मेंदूशी मैत्रीवर व्याख्यान
जळगाव : केवळ कमी गुण मिळाले म्हणून मुलांना रागवू नका, त्यांच्यातील बुद्धीमत्ता ओळखा, आजची शिक्षणपद्धतीही बुद्धीमत्ता मोजण्यास अपुरी आहे,असे मत डॉ़ श्रुती पानसे (पुणे)यांनी व्यक्त केले़ कै़ भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानात मेंदूशी मैत्री या विषयावर त्या बोलत होत्या़
रविवारी रोटरी भवनात आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी डॉ़ राजेश जैनहोते़ डॉ़ जयंत जहागीरदार हे व्यासपीठावर उपस्थित होेते़ सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले़ डॉ़ आनंद दशपुत्रे यांनी प्रश्नांचे वाचन केले़ डॉ़ पानसे म्हणाल्या की मुलांना शाळेत टाकण्याचे वय हे साडेचार वर्षाच्या पुढेच हवे मात्र आपल्याकडे अडीच वर्षांपासून मुलांना शाळेत पाठविले जाते़ त्याच्या मनगटांचा आकलन शक्तिचा विकास झालेला नसताना अभ्यास लादणे हा क्रूरपणा आहे. कु्ऱरपणा सध्या अनेक बालवाड्या करीत असून यासाठी पालकही तेवढेच जबाबदार आहेत़
असे वागा मुलांशी... यावर दिल्या टिप्स...
-मोबाईल हा कौतुकाची गोष्ट नाही तो मुलांपासून लांबच ठेवा़
-मुलांना मांडीवर बसवून गोष्टीच पुस्तक वाचून दाखवा, त्याला चित्रकला शिकवा, वेगवेगळी चित्रे दाखवा़
-बदाम, आक्रोळ तर मेंदूसाठी उपयुक्तच आहे, पण थोडा जवसही घ्यावे
-राग आल्यानंतर तत्काळ एक ते दहा आकडे मनात मोजावेत, पाणी प्यावे किंवा दीर्घ श्वास घ्यावा,यामुळे रागावर नियंत्रण मिळते
-हॅप्पीली केमीकल्स निर्माण करणे गरजेचे असते़ त्यासाठी जुन्या मित्रांशी बोला, नवनवीन कौशल्य शिका़
-मुलांना एकच सूचना वारंवार देऊ नका
-अभ्यास हा शिक्षा नव्हे तर आवड वाटणे गरजेचे आहे
-मुलांचे अजिबात न ऐकणे व सर्वच ऐकणे हे योग्य नाही
४मुलांची ७ ते ८ तास झोप झालीच पाहिजे