दापोरा येथे वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 08:00 PM2018-08-17T20:00:58+5:302018-08-17T20:04:02+5:30

जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळदार पावसामुळे जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पावसासह जोरदार वारे वाहत असल्याने ऐन कापणीवर आलेले केळीचे घड कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Inadequate rain at Dapora caused damage to banana plantations | दापोरा येथे वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान

दापोरा येथे वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फटकाकेळी उत्पादक शेतक-यांना आर्थिक फटकामहसूल प्रशासनाचे पंचनाम्याचे आदेश

जळगाव -जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळदार पावसामुळे जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पावसासह जोरदार वारे वाहत असल्याने ऐन कापणीवर आलेले केळीचे घड कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अनेक दिवसांपासून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. गुरुवारी १८ दिवसाच्या खंडानंतर पावसाने आगमण झाले. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजिवणी मिळाली असली तरी वाºयामुळे केळीच्या बागांना नुकसान झाले आहे. दापोरा येथील रघुनाथ सखाराम पाटील यांच्या शेतातील पाच हजार केळीच्या घड पैकी एक हजार घड जमिनोदोस्त झाले आहे. त्यांच्यासह गावातील अनेक शेतकºयांचेही शेकडो घड कोसळले आहेत.
दापोरा परिसरातील केळीच्या झालेल्या नुकसानाबाबत पाहणी करून तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश तहसिलदार अमोल निकम यांनी दिले आहे.

Web Title: Inadequate rain at Dapora caused damage to banana plantations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.