कृषी विभागाच्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:15+5:302021-05-23T04:15:15+5:30
जळगाव : शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मधली साखळी कमी झाल्याने चांगला भाव ...
जळगाव : शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मधली साखळी कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने कृषि विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत कृषि कार्यालय आवारात तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर चौधरी, आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, शैलेश चव्हाण यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना तांदूळाच्या बॅगचे वितरण करण्यात आले. उपस्थितांचे आभार चव्हाण यांनी मानले.