बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजीनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:19 PM2020-03-06T22:19:16+5:302020-03-06T22:21:47+5:30

महाव्यवस्थापक मित्तल यांची उपस्थिती : विविध विभागातील कामकाजाची केली पाहणी

Inauguration of battery operated railway engine | बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजीनचे उद्घाटन

बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजीनचे उद्घाटन

Next


भुसावळ : रेल्वेच्या विद्युत लोको शेड मधील कर्मचाऱ्यांनी बॅटरीवर चालणाºया तयार केलेल्या इंजिनाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याचबरोबर त्यांनी विविध विभागांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. आरओेएच डेपो जवळील नवीन पुलाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
रेल्वे विद्युत लोको शेडमधील कर्मचाºयांनी जुन्या इंजिनला बॅटरीवर चालविण्याचा नवा विक्रम केला आहे. हे इंजिन २५ हजार व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीवर चालेल. याचा वापर शटींगसाठी केला जाणार आहे. ६ रोजी पहाटे साडेचारला मित्तल यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी मध्य रेल्वेचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रधान मुख्य विद्युत अभियंता अतुल पाठक, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी ए. के. सिन्हा, प्रधान मुख्य सरक्षा अभियंता एस. पी. वावरे, मध्य रेल्वेचे प्रमुख अधिकारी, मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता, अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा आदी उपस्थित होते. दरम्यान रेल्वे विद्युत इंजीन कारखान्याचे (पीओेएच) आणि तेथील वर्कशॉपला मित्तल यांनी भेट देऊन निरीक्षण केले. यानंतर मालगाडीे परीक्षण केंद्रात निरीक्षण करण्यात आले.

Web Title: Inauguration of battery operated railway engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.