भडगाव शेतकरी सहकारी संघात भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:03+5:302021-06-23T04:12:03+5:30

यावेळी गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, संघाचे अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक संजय पाटील, जयवंत पाटील, शिवाजी ...

Inauguration of Bharadgaon Shetkari Sahakari Sangh | भडगाव शेतकरी सहकारी संघात भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन

भडगाव शेतकरी सहकारी संघात भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्‌घाटन

Next

यावेळी गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, संघाचे अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक संजय पाटील, जयवंत पाटील, शिवाजी पाटील, भैय्यासाहेब पाटील, नागराज पाटील, भीमराव पाटील, राजेंद्र राजपूत, राजेंद्र पाटील, तज्ज्ञ संचालक नागेश वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा प्रशासक संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार तसेच पुरवठा विभागाचे पुरवठा अधिकारी, गोडाऊन किपर कांबळे, संघाचे व्यवस्थापक अवधूत देशमुख, ग्रेडर दिलीप नरवाडे, क्लार्क विशाल भोई, हमाल मुकरदम अहमदखान आगा खान, पिरण कोळी, मुक्तार शेख, दिलीप शहा, अकबर शहा आदी उपस्थित होते.

तालुक्यात ज्वारी १०६२, मका ५६०, गहू १२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तालुक्यासाठी उद्दिष्ट ज्वारी २२०० क्विंटल, मका ५५०० क्विंटल, गहू ३६० क्विंटल देण्यात आले आहे. आमदार किशोर पाटील, तहसीलदार सागर ढवळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे ज्वारीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शासकीय भरड धान्य सुरु करावे, या मागणीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तसेच भडगाव तालुका शेतकरी संघटनेनेही भरड धान्य सुरु करण्याबाबत निवेदन प्रशासनास दिले होते. अखेर शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.

शासकीय नियमानुसार, नाव ऑनलाईन नोंदणीनुसार धान्य खरेदी करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Inauguration of Bharadgaon Shetkari Sahakari Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.