भुसावळात नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 05:08 PM2019-09-08T17:08:10+5:302019-09-08T17:09:08+5:30
कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : येथील कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक अनिसा तडवी, तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे समन्वयक दीपक बोरसे उपस्थित होते.
व्यासपीठावर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.एन.इ.भंगाळे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. व्ही.जी.कोचुरे, वाणिज्य मंडळाचे प्रमुख डॉ.पी.के.पाटील उपस्थित होते.
सुरवातीस प्रा.डॉ.पी.के.पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिसा तडवी यांनी तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार संधी याची सविस्तर माहिती दिली. कौशल्य विकास योजने अंतर्गत बँकिंग, वित्तीय, विमा, प्रसारमाध्यमे अशा विविध क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांना मोठी मागणी असते. त्यासाठी लागणारी कौशल्ये युवकांमध्ये विकसित व्हावी यादृष्टीने सरकारमार्फत कौशल्य विकासाच्या विविध योजना विनामूल्य राबविल्या जातात. त्याचा फायदा युवकांनी घेणे आवश्यक आहे, असे अनिसा तडवी यांनी सांगितले.
दुसरे वक्ते दीपक बोरसे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी कोणकोणत्या कर्ज योजना उपलब्ध आहेत याची माहिती दिली.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. प्रा.डॉ.रश्मी शर्मा यांनी आभार मानले. प्रा.डॉ.ममता पाटील व प्रा.स्मिता बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्रा.भूषण चौधरी, प्रा.स्वाती शेळके, प्रा.वर्षा पाटील, प्रा.प्रियंका वारके, प्रा.जयश्री चौधरी, प्रा. हेमंत सावकारे, प्रा.सपना कोल्हे यांनी परिश्रम घेतले.