मुक्ताईनगर येथे भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:22 PM2018-12-09T17:22:29+5:302018-12-09T17:24:02+5:30
शासनाकडून तालुका शेतकी सहकारी संघाद्वारे तहसील गोडावूनमध्ये भरडधान्य केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्य शासनाकडून तालुका शेतकी सहकारी संघाद्वारे तहसील गोडावूनमध्ये भरडधान्य केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला. १० डिसेंबरपासून कुºहा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा मका व ज्वारी यांची मोजणी केली जाणार आहे.
शासकीय खरेदी केंद्रांवर भरडधान्य विक्री करावयाची असेल तर आॅनलाइन नोंदणी आवश्यक आहे. आतापर्यत तालुक्यातील २३८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे . मका हेक्टरी ३३ क्विंटल व ज्वारी हेक्टरी १५ क्विंटल अशा मर्यादेत मोजली जाणार आहे. हायब्रीड ज्वारीचा २४३० रुपये व मका १७०० रुपये हेक्टरी घेण्यात येणार आहे. सोमवारपासून शेतकºयांंनी ज्वारी, मका मोजणीसाठी आणावा, असे शेतकी संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार श्याम वाडकर, जिल्हा परिपद सदस्य नीलेश पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती विकास पाटील, समाधान कारले, दशरथ कांडेलकर, शेतकी संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे, व्यवस्थापक रतीराम सपकाळे उपस्थित होते.
शेतकरी बांधवांना मका विक्री करायची असेल त्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी व खरेदी वेळी पिकाची नोंद असलेला आॅनलाईन सातबारा उतारा आवश्यक आहे. हस्तलिखीत उतारे स्वीकारण्यात येणार नाहीत तर ३१ डिसेंबरपर्यत खरेदीचा कालावधी असेल, असे शेतकी संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.