एसएसबीटी महाविद्यालयात हायटेक लॅबचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:01+5:302021-01-17T04:15:01+5:30
जळगाव - बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक रोबोटिक्स लॅबचा उद्घाटन समारंभ शनिवारी थाटात पार पडला. यावेळी प्रमोद ...
जळगाव - बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक रोबोटिक्स लॅबचा उद्घाटन समारंभ शनिवारी थाटात पार पडला.
यावेळी प्रमोद बोरोले यांच्याहस्ते लॅबचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, डॉ. शेखर सुरळकर, डॉ. पी. एच. झोपे, डॉ. पी. जे. शाह, डॉ. पी. व्ही. ठाकरे, डॉ. एम. पी. देशमुख, डॉ. व्ही. एम. देशमुख , प्रा. एन. एम. काझी, प्रा. अमोल वाणी, प्रा. अतुल करोडे, प्रा. सुरेंद्र रामटेके, प्रा. सुनील खोडे आदींची उपस्थिती होती.
प्रोजेक्ट बेस लर्निंग ही सुविधा उपलब्ध होणार
महाविद्यालयातील ई. ॲण्ड टी. सी. विभागाने आय. आय. टी., मुंबई यांच्या सहकार्याने ई-यंत्र रोबोटिक्स लॅबची स्थापना केली आहे. या अंतर्गत ई-यंत्र लॅब सेटअप इनिशिएटिव्ह (एलएसआय) च्याद्वारे प्राध्यापक व सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट बेस लर्निंग ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईचे मार्गदर्शन लाभणार आहे.