कोविड लस नोंदणी मदत केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 08:38 PM2021-03-08T20:38:08+5:302021-03-08T20:38:08+5:30
जळगाव - शिवसेना जळगाव महानगरतर्फे स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या साहाय्यासाठी ऑनलाइन कोविड लस नोंदणी मदत केंद्राचे रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक ...
जळगाव - शिवसेना जळगाव महानगरतर्फे स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या साहाय्यासाठी ऑनलाइन कोविड लस नोंदणी मदत केंद्राचे रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक एन.एस. चव्हाण, मनपा विरोधी पक्षनेता सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, शिवसेना नगरसेवक नितीन बर्डे, शहर संघटक दिनेश जगताप, विभागप्रमुख प्रशांत सुरळकर, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अर्जुन भारुळे, पीयुष हसवाल, हितेश सूर्यवंशी, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी, संदीप सूर्यवंशी, वैभव पाटील, शिवम महाजन, गोपाळ पाटील, सुनील मराठे, गजेंद्र चौधरी, चंद्रकांत मराठे उपस्थित होते. हे केंद्र ७ ते १५ मार्च दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संत कंवरराम चौक (पांडे चौक) जळगाव येथे सुरू राहणार आहे. केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची कोविड लससाठी ऑनलाइन नोंदणी करून देण्यात येणार आहे.