जळगावात लोकमत शॉपिंग उत्सवचे थाटात उद्घाटन

By admin | Published: January 6, 2017 11:31 PM2017-01-06T23:31:38+5:302017-01-06T23:31:38+5:30

पारख प्लेक्सस रिअल्टी लि. प्रस्तुत तीन दिवसीय लोकमत शॉपिंग उत्सव-२०१७चे शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी थाटात उद््घाटन झाले. ‘लोेकमत’चे

Inauguration of Lokmat Shopping Festival in Jalgaon | जळगावात लोकमत शॉपिंग उत्सवचे थाटात उद्घाटन

जळगावात लोकमत शॉपिंग उत्सवचे थाटात उद्घाटन

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 06 -  पारख प्लेक्सस रिअल्टी लि. प्रस्तुत तीन दिवसीय लोकमत शॉपिंग उत्सव-२०१७चे शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी थाटात उद््घाटन झाले. ‘लोेकमत’चे सर्वच उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी काढले. लोकमत शॉपिंग उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रिंगरोडवरील यशोदया मल्टीपर्पज हॉलमध्ये ६ ते ८ जानेवारी दरम्यान आयोजित उत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे, पारख प्लेक्सस रिअल्टी लि. ‘मेरा घर’चे विनय पारख, ए.एम.सोलर टंर्कीचे योगेश मुंदडा, साईकृपा बेन्टेक्स ज्वेलर्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक्स प्रेझेंट आर्टीकलच्या हेमलता बामणोदकर, रुख्मा टेण्ट हाऊसचे किशोर महाजन, ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख मिलिंद कुळकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा उपस्थित होते.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतीस अभिवादन करून मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वालन व फीत कापून उत्सवाचे उद््घाटन करण्यात आले.प्र्रास्ताविक मिलिंद कुळकर्णी यांनी केले.
सुरुवात चांगली झाली तर वर्ष चांगले जाते
विनय पारख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ‘लोकमत’ ने या उत्सवाचे आयोजन केल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण वर्षही चांगले जाते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘लोकमत’ व जळगाव नाण्याचा दोन बाजू
विनय पारख म्हणाले, ‘लोकमत’ व जळगाव शहर म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत. दिवसाची सुरुवात ‘लोकमत’शिवाय शक्यच नाही. ‘लोकमत’च्या विविध योजना, विविध सदरे यामुळे तो एक अविभाज्य घटक बनला आहे. ‘लोकमत’शिवाय सकाळ झालेलीच नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Inauguration of Lokmat Shopping Festival in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.