खेरडे येथे दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 06:14 PM2018-09-22T18:14:43+5:302018-09-22T18:16:16+5:30

Inauguration of milk chilling center at Khedde | खेरडे येथे दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन

खेरडे येथे दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देशेतकरी वर्गाने अधिकाधिक दूध व्यवसायाकडे वळावे. जिल्हा दूध संघातर्फे संपूर्ण अनुदानात खेरडे सोसायटीस मशीन

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील खेरडे येथे नवीन दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माधवदास महाराज संघाच्या संचालक सुनीता पाटील, वाघले येथील माजी सरपंच युवराज पाटील, खेरडे येथील सरपंच उषा पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील, अरुण देशमुख यांच्यासह गावातील व परिसरातील अनेक मान्यवर व दूध उत्पादक उपस्थित होते.
या दूध शीतकरण केंद्रामुळे गावातील व परिसरातील दूध उत्पादकांना मोठा फायदा होणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले.
सदरचे मशीन जिल्हा दूध संघातर्फे संपूर्ण अनुदानात खेरडे सोसायटीस देण्यात आले आहे, अशी माहिती प्रमोद पाटील यांनी दिली.
शेतकरी वर्गाने अधिकाधिक दूध व्यवसायाकडे वळावे, या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
संघ देत असलेल्या औषधी व सर्व लसींचा फायदा दूध उत्पादकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी चेअरमन पंकज पाटील, सचिव मनोज पाटील यांच्यासह संचालक मंडळाने परिश्रम घेतले. या वेळी वाकडी, रोकडे, बाणगाव, सोनबर्डी, लोंजे येथील दूध संस्थेचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा दूध संघाचे संकलन प्रमुख देवरे, पाचोºयातील संजय पाटील, कर्मचारी नितीन पाटील, सुनील पाटील, विशाल पाटील उपस्थित होते.



 

Web Title: Inauguration of milk chilling center at Khedde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.