जळगावात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:23 PM2017-12-17T13:23:02+5:302017-12-17T13:23:10+5:30
औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17- जळगाव येथे जिल्हा न्यायालय परिसरात रविवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्ष विजया कमलेश तहिलरामाणी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, न्यायमूर्ती संगीतराव पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रा.रा. महाजन, सचिव कौशिक ठोंबरे आदी उपस्थित होते.