जळगाव जि.प.मध्ये बाह्यरुग्ण कक्षाचे उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:38 PM2019-04-03T12:38:49+5:302019-04-03T12:39:34+5:30
जि.प.चे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांना आरोग्य सेवा
जळगाव : जि.प.चे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी जि.प.मध्ये आरोग्य विभागाच्यावतीने बाह्यरुग्ण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचे उद््घाटन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, माता-बाल संगोपन अधिकारी समाधान वाघ यांनी पाठपुरावा केला. उद््घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, आयुर्वेदीक विस्तार अधिकारी डॉ. मनोहर बावणे, साथरोग अधिकारी डॉ. वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद चौधरी, कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे, सांख्यिकी अधिकारी वाणी, कार्यालयीन अधीक्षक नूतन तासखेडकर, विस्तार अधिकारी विद्या पाटील, विद्या राजपूत, विजय कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किशोर पाटील, नीलेश पाटील, औषध निर्माण अधिकारी सुरेश मराठे, खडके, आरोग्य सहाय्यक बी.टी. सूर्यवंशी, आरोग्य सेविका विजया पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या कक्षात एक डॉक्टर, एक औषध निर्माण अधिकारी, एक आरोग्य सेविका कार्यरत राहणार आहे. जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी सभेत हा विषय मांडला होता.