नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:45 PM2019-10-01T17:45:19+5:302019-10-01T17:45:36+5:30
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाले.
भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन मू.जे.महाविद्यालयातील डॉ.एस.एन.भारंबे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बºहाटे, डॉ.सुरेश गोसावी, डॉ.रेखा पाटील अतिथी होते.
प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे चेअरमन डॉ.जी.आर.वाणी यांनी केले.
उदघाटनपर भाषणात डॉ.एस.एन.भारंबे यांनी ‘पर्यावरण व विज्ञान’ यांचे मानवी जीवनात महत्त्व पटवून दिले. त्यानंतर डॉ.सुरेश गोसावी यांनी मानवाच्या जीवनात प्रगत विज्ञानाचे फायदे तसेच अतिरिक्त वापरामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती प्रयोगाव्दारे सादर केली व विज्ञान आणि अध्यात्म यांची सुसंगती कशी साधावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी आदिती हिंदुजा, मानसी शर्मा व काजल अठवाणी यांनी त्यांचे अनुभव सांगितले.
सूत्रसंचालन डॉ.मनोज जाधव यांनी केले व आभार डॉ.उमेश फेगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळ समिती सदस्य, प्रा.सचिन कोलते, प्रा.शंकर पाटील, प्रा.हर्षल पाटील, प्रा.स्वाती फालक, विनय चौधरी, ग्रंथालय विभाग यांचे सहकार्य लाभले.