चाळीसगावला रविवारी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:02 PM2018-08-22T16:02:28+5:302018-08-22T16:02:53+5:30

३१ वर्षाच्या पाठपुराव्याला यश : पक्षकारांना होणार मोठा फायदा

Inauguration of senior civil court at Chalisgaon on Sunday | चाळीसगावला रविवारी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

चाळीसगावला रविवारी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

Next

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या ३१ वर्षांपासून चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापनेसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेरीस सहा महिन्यांपूर्वी त्यावर मंत्रीमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटल्याने २६ आॅगस्ट रोजी धुळे रोडस्थित न्यायालयातच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन होत आहे. यासाठी बहुसंख्येने न्यायाधीश उपस्थित राहणार आहे.
वरिष्ठस्तर न्यायालयातील दाव्यांसाठी तालुक्यातील पक्षकारांना जळगाव येथे जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होता होता. पक्षकारांचा सुनावणीसाठी पूर्ण दिवस तर कधी अधिक वेळ लागत असे. चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या गावापासून जळगावचे अंतर सव्वाशे किलोमीटरहून अधिक आहे. सद्य:स्थितीत जळगाव न्यायालयात चाळीसगाव तालुक्यातील दोन हजारे दावे दाखल आहेत.
३१ वषार्पासून सुरू होता लढा
१९८७ मध्ये पहिल्यांदा चाळीसगाव वकील संघामार्फत वरिष्ठस्तर न्यायालय स्थापनेच्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. मात्र गेल्या ३१ वर्षात वेगवेगळी तांत्रिक कारणे पुढे करून न्यायालय स्थापनेची मागणी टोलवण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपूूर्वी आमदार उन्मेष पाटील यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला.
उच्च न्यायालयाने तांत्रिक बाबींची पूर्तता पूर्ण झाल्याचे शासनाला कळविल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापनेला मान्यता दिली.
वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयासाठी पदांसह निधीही मंजूर करण्यात आला. यासाठी एकूण ११ पदांना मंजुरी देण्यात आली असून, निधीही प्रस्तावित करण्यात आला आहे. रविवारी न्यायालयाचे उद्घाटन होत आहे.

३१ वर्षांपासूून वरिष्ठस्तर न्यायालयाचा प्रश्न प्रलंबित होता. पक्षकारांची अडचण, त्यांचा वाया जाणारा वेळ आणि पैशांचा अपव्यय न्यायालयाच्या स्थापनेमुळे थांबणार आहे. पक्षकार आणि वकील बांधवांना फायदा होणार होणार आहे.
- उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव

Web Title: Inauguration of senior civil court at Chalisgaon on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.