पाणी फिल्टर प्लँटचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:13+5:302021-08-12T04:20:13+5:30
या प्लँटमुळे गावातील लोकांना १ रुपयात १ लिटर व पाच रुपयात १० लिटर पाणी मिळणार आहे. या प्लँटची १५ ...
या प्लँटमुळे गावातील लोकांना १ रुपयात १ लिटर व पाच रुपयात १० लिटर पाणी मिळणार आहे. या प्लँटची १५ वर्षे देखभाल व दुरुस्ती कंपनी करणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे तो सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अनिल कुरी यांनी दिली.
कंपनीने आरोग्य तपासणी करण्यासाठी एका डॉक्टरसह आरोग्य यंत्रणा उभी केली आहे. या योजनेतून मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली तरच शेतकरी जगेल आणि बियाणे खरेदी करेल, यात कंपनीचा स्वार्थ असला तरी, कृषी आणि आरोग्याची सांगड घातली जात आहे, हे महत्त्वाचे आहे. कंपनीच्या भविष्यात आरोग्यविषयक काही योजना असतील, तर त्या शासकीय योजनांशी जोडून बळीराजाला चांगले आरोग्य देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
माजी जिल्हा परिषद सदस्य आणि श्री शिवाजी सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र चुडामण पाटील यांनी वॉटर प्लँटला कुलर बसविण्यात यावे, अशी मागणी केली व यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सदस्य लियाकत पठाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवींद्र केदारसिंग राजपूत, ग्रामविकास अधिकारी पाटील, माधव महाजन, अभिजित राजपूत यांनी परिश्रम घेतले.