सावित्रीच्या लेकींसाठी प्रोत्साहन भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:07 PM2020-01-03T12:07:28+5:302020-01-03T12:07:43+5:30

लोकवर्गणीतून जमा झाला १ कोटी ५ लाखांचा निधी

Incentive allowance for the Lakers of Savitri | सावित्रीच्या लेकींसाठी प्रोत्साहन भत्ता

सावित्रीच्या लेकींसाठी प्रोत्साहन भत्ता

Next

सागर दुबे ।
जळगाव : हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या विद्यार्थिनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेतंर्गत जिल्ह्यातील २११० सावित्रीच्या लेकींच्या खात्यांवर एकूण ७ लाख ५९ हजार ६०० रूपयांचा प्रोत्साहनपर भत्ता वर्ग करण्यात येणार आहे़ एका विद्यार्थिनीला प्रतिवर्षी फक्त ३६० रूपये प्रोत्साहन भत्ता मिळतो, त्यात वाढ करण्याची मागणी होत आहे.
मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाºया सावित्रीबाई फुले यांच्या नावे दत्तक पालक योजना प्राथमिक शिक्षण विभागाकडून राबविली जाते़ राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही योजना बंद पडलेली असून मात्र, जळगावात ही योजना लोकवर्गणीच्या माध्यमातून राबविण्यात येत असते़ सुमारे १ कोटी ४ लाख ९६ हजार रूपयांचा निधी हा लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे़ ही रक्कम बँकेत ठेवण्यात आली आली़ त्या रक्क मेच्या व्याजातून दत्तक पालक योजना राबविली जाते़

२११० विद्यार्थिनींची निवड
विशेष म्हणजे, योजनेचा लाभ हा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी विद्यार्थिनींना दिला जातो़ दरवर्षी प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीकडून लाभार्थी विद्यार्थिनींची निवड केली जाते़ यंदा जिल्ह्यातील २११० विद्यार्थिनींची योजनेच्या लाभासाठी निवड केली गेली असून शुक्रवार, ३ जानेवारी रोजी या विद्यार्थिनींच्या खात्यांवर प्रत्येकी ३६० रूपये प्रोत्साहन भत्ता वर्ग केला जाणार आहे़ एकूण ७ लाख ५९ हजार ६०० रूपयांचा निधी विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा होईल़

Web Title: Incentive allowance for the Lakers of Savitri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.