बाधितांचे प्रमाण वाढून ५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:10+5:302020-12-11T04:42:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरूवारी ७५८ अहवालांमध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले असून हे प्रमाण वाढून ५.६७ टक्क्यांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूवारी ७५८ अहवालांमध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले असून हे प्रमाण वाढून ५.६७ टक्क्यांवर पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रमाण २ ते ३ टक्क्यांच्या मध्ये होते. दरम्यान, चाचण्या मात्र, गेल्या आठवडाभरापासून कमी करण्यात आलेल्या आहेत. एक हजाराच्या खालीच चाचण्या होत असल्याचे चित्र आहे.
एकट्या जळगाव शहरात २३७ आरटीपीसीआर तर ३७ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाभरातून एकत्रित आरटीपीसीआरसाठी ३७७ स्वॅब घेण्यात आले आहेत. अद्यापही आरटीपीसीआर वाढलेल्या नसल्याचे चित्र आहे. गुरूवारी आलेल्या अहवालांमध्ये शहरात २० नवे रुग्ण समोर आले आहेत. ही संख्याही वाढली असून भुसावळ तालुक्यातील ७२ वर्षीय पुरूष आणि ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, चाचण्या कमी होत असल्या तरी बाधितांचे प्रमाण वाढल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. हे प्रमाण आता ५ पेक्षा अधिक टक्क््यांवर पोहचल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५४९५१ असून ५३२३७ बरे झालेले आहेत. तर १३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ४०५ वर आलेली आहे.