भुसावळ आयुध निर्माणीत निगमीकरण पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:26 AM2021-06-20T11:26:13+5:302021-06-20T11:26:35+5:30

भुसावळ येथे कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

Incineration of Bhusawal Ordnance Factory | भुसावळ आयुध निर्माणीत निगमीकरण पुतळ्याचे दहन

भुसावळ आयुध निर्माणीत निगमीकरण पुतळ्याचे दहन

googlenewsNext



भुसावळ : केंद्र शासनाकडून आयुध कारखान्यांचे निगमीकरण करण्याचा प्रस्ताव घेण्यात आला. २०० वर्षे जुने आयुध कारखाने जे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या शस्त्र अस्त्र दारुगोळा व विविध प्रकारची सामग्री सैन्यातील तिन्ही दलांसाठी व आर्म फॉर्सेससाठी पुरवतात अशा आयुध निर्माणीचे निगनमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे या आयुध निर्माणीचे डीपीएसयु (डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग) च्या आधारावर सात विभिन्न विभागात वर्गीकरण होउन येणाऱ्या दोन वर्षात निगमीकरणचे माध्यमातून मार्गस्थ होतील.
अशा या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला तेला बाधा आणणाऱ्या निर्णयाच्या विरोधात देशातील सर्व संरक्षण कामगार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. देशातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत ऑल इंडिया देफेन्स एम्पलॉइज फेडरेशन, इंडियन डिफेन्स नॅशनल वर्कर फेडरेशनच्या भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीद्वारे निगमीकरण निर्णयानंतर तत्काळ आंदोलन करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार काल काळ्या फिती लावून निदर्शने केल्यानंतर आज भारत सरकारच्या निगमीकरण नीतीचा पुतळा दहन करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता कामावर जाते वेळी आयुध निर्माणीचे सर्व कर्मचारी गेटवर एकत्र जमून त्या ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत संयुक्त संघर्ष समिती आयुध निर्माणी भुसावळच्या माध्यमातून निगमीकरणाचा पुतळा जाळला. यावेळी आयुध निर्माणी प्रशासन व पोलीस प्रशासन भुसावळ शहर यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी संयुक्त संघर्ष समितीचे प्रमुख वक्ते जेसीएम-३ चे दिनेश राजगिरे, किशोर चौधरी, किशोर सूर्यवंशी, लक्ष्मण वाघ यांचे प्रमुख भाषणे झाली.
दीपक भिडे, किशोर बढे, जितू आंबेडकर, राजकिरण निकम, मधुकर राऊत, राहुल पाटील, संजय अहिरे, जावेद तडवी यांनी पुतळा दहन व कार्यक्रमाचे नियोजन केले.
पुढे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तिन्ही फेडरेशनचे नेते होणाऱ्या संयुक्त बैठकीत घेतील, अशी माहिती स्थानिक संयुक्त संघर्ष समितीचे संयोजक दिनेश राजगिरे यांनी दिली.

Web Title: Incineration of Bhusawal Ordnance Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.