सीएमव्हीच्या नुकसानीचा केळी फळपीक विमा योजनेत समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:53 PM2020-09-11T14:53:59+5:302020-09-11T14:55:23+5:30
मागण्यांचे निवेदन भाजपच्या किसान मोर्चातर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
रावेर : केळी फळपीक विमा योजनेचे जुने निकष कायम करून गतवर्षीच्या संरक्षित विम्याची रक्कम अदा करा, सीएमव्हीच्या नुकसानीचा केळी फळपीक विमा योजनेत समावेश करा, अति पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन व कापसाच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई अदा करा आदी मागण्यांचे निवेदन भाजपच्या किसान मोर्चातर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव भोळे व उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके यांनी तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर व तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील तथा महेश चौधरी यांनी जिल्हाधिकाºयांना शेतकºयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन सादर केले.
या निवेदनात केळी फळपीक विमा योजनेचे जुने निकष कायम करून गतवर्षीच्या संरक्षित विम्याची रक्कम अदा करा, सीएमव्हीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई अदा करा, सीएमव्हीच्या नुकसानीचा केळी फळपीक विमा योजनेत समावेश करा, अति पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन व तीळ या पिकाचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई अदा करा, प्रलंबित कर्जबाजारी शेतकºयाची कर्जमाफी करा, नियमीत कर्जफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, नोंदणीकृत शेतकºयांच्या गेल्या वर्षीचा कापूस न मका खरेदी करून त्यांचे चुकारे तातडीने अदा करा, युरीया, पोटॅश व मिश्रखते मुबलक प्रमाणात उपलब्ध करा, खतांची कृत्रिम टंचाई व बोगस खतांची विक्री करणाºया खत विक्रेत्यांविरूध्द तातडीने गुन्हे दाखल करा, पीक संरक्षण संस्थांचे बळकटीकरण करा, शेती शिवारातील गाडीरस्ते खडीकरण करा, कोरोना काळातील घरगुती व कृषी वीजबील माफ करा अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. या निवेदनावर उपस्थितांच्या स्वाक्ष?्या आहेत.