नाभिक समाजास अनु.जातीत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 09:03 PM2020-09-09T21:03:33+5:302020-09-09T21:04:32+5:30
विविध मागण्यांचे दिले निवेदन
भडगाव : कोरोना महामारीच्या काळात नाभिक समाजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. संकट काळातील विविध समस्यातुन शासनाने मुक्त करावे तसेच समाजास अनु.जातीमध्ये समाविष्ट करावे यासाठी विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार माधुरी आंधळे यांना नाभिक समाज मंडळाच्या वतीने देण्यात आले.
नाभिक समाजावर मागील पाच महिन्याच्या काळात मोठे संकट उभे राहिले आहे. समाजातील १२ युवकांनी या काळात आत्महत्या केल्या आहे. नाभिकांचा व्यवसाय २५ टक्के वर येऊन ठेपला आहे. समाज उपासमारीला तोंड देत असतांना सोशल मीडिया वरील बदनामीला सामोरे जावे लागत आहे. या परीस्थितीत नाभिक समाजाने शासनाला अनेक निवेदने दिलेली आहेत, मात्र त्याची दखल नाही.
यावेळी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, कार्यकारणी सदस्य काशिनाथ शिरसाठ, राजेद्र सोनवणे, शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगारे, सुभाष ठाकरे, निलेश महाले, राजु महाले, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, सुर्यभान वाघ, विनोद शिरसाठ, शाम नेरपगारे, उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी १० लाख रूपयाची मदत द्यावी, राज्य शासनाने केंद्र सरकारला २६ मार्च १९७९ रोजी केलेल्या शिफारसी नुसार नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे, लॉकडाऊन काळातील सलून व्यावसायिकस दरमहा १० हजार रूपये मदत मिळावी, सलून व्यावसायिकांना ५० लाख रूपये विमा सरंक्षण देण्यात यावे, सलून व्यावसायिकांचे लॉकडाऊन मधील विज बिल माफ करण्यात यावे, सलून व्यावसायिकांना संपूर्ण सलूनकाम करण्यास करण्यास परवानगी द्यावी. अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.