तांडे तांडा वस्ती सुधार योजनेत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:32+5:302021-09-26T04:18:32+5:30
तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत बुलडाणा, यवतमाळ, जालना, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, वाशी, नांदेड, बीड हे जिल्हे तांडा ...
तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत बुलडाणा, यवतमाळ, जालना, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, वाशी, नांदेड, बीड हे जिल्हे तांडा वस्ती सुधार योजनेत अंतर्भूत करण्यात आले आहेत. याच धर्तीवर उर्वरित महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबारसह सर्व जिल्ह्यांची तांडा वस्तीसाठी निवड करावी. महाराष्ट्रातील अनेक तांडे आजपण शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत.
अजूनही अनेक सोयी सुविधांपासून आमचा समाज लांब आहे. बहुतांशी ठिकाणी गावांना तांडे वस्ती जोडण्यात आली आहे. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तांड्याचा विकास समतोलपणे साधला जात नाही. मग शेवटचा पर्याय हा तांडा वस्ती सुधार योजनेचा असतो. तरी आमच्या जळगाव जिल्ह्याचा समावेश त्यात करावा, अशी मागणी प्रकाश जाधव यांनी लावून धरली आहे.