पाणीटंचाई आराखडय़ात 36 गावांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 12:14 AM2017-01-16T00:14:26+5:302017-01-16T00:14:26+5:30
पारोळा : टंचाईग्रस्त गावांसाठी विहीर, कूपनलिका अधिग्रहीत करण्याचे प्रस्ताव, उपाययोजना सुरू
पारोळा : तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात 36 गावांचा पाणीटंचाई समस्याग्रस्त गावांमध्ये समावेश केला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ आतापासून प्रय}ांची गरज आहे.
पारोळा तालुका अवर्षण-प्रवण क्षेत्रात मोडतो. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम पाणीसाठय़ावर झालेला आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र त्यामुळे तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. याचा परिणाम आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईवर होऊ शकतो. उन्हाळ्यात भासणा:या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा पंचायत समितीतर्फे नुकताच तयार करण्यात आला असून, त्यात 36 गावांना टप्प्याटप्प्याने पाणीटंचाईची झळ बसू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या आराखडय़ात पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाही केलेल्या आहेत.
यात पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च 17 यादरम्यान मोहाडी, दहीगाव, खोलसर, शिरसोदे, जिराळी, बहादरपूर, कोळपिंप्री, धूळपिंप्री, भिलाली, मंगरूळ, वसंतनगर, पुनगाव, आंबापिंप्री, मोंढाळे प्र.अ., चिखलोद बु.।।, नेरपाट, पिंपळभैरव, दळवेल, पिंपळकोठा तांडा अशा 17 गावांना पाणीटंचाईची शक्यता आहे. यात 10 गावांना विहीर अधिग्रहणसाठी 7.5 लाख रुपये, तर पिंपळभैरव गावासाठी नवीन विंधन विहीर, कूपनलिका यासाठी 30 हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसेच शिरसोदे, बहादरपूर, भिलाली, मोंढाळे प्र.अ., दळवेल या चार गावांना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळ योजना दुरुस्तीबाबत सुचविण्यात आले आहे. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
पिंपळकोठा तांडा या गावाला तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुमारे दोन लाख रुपये खर्चाची सुचविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 18 कामांवर 14 लाख 90 हजारांचा खर्च अपेक्षित आहे.
संभाव्य पाणीटंचाईचा दुस:या टप्पा एप्रिल 17 ते जून 17 असा आहे. यात 17 गावांचा संभाव्य पाणीटंचाईत समावेश करण्यात आला आहे. त्यात 17 कामांना 15 लाख 28 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या टप्प्यात पाणीटंचाईसाठी टेहू, पोपटनगर, सुमठाणे, चोरवड, शेवगे प्र.ब., लोणी खुर्द, लोणी बु.।।, वाघरे, शिवरे दिगर, शेळावे बु.।।, शेळावे खुर्द, मेहू, हनुमंतखेडा, रामनगर, इंधवे, हिवरखेडा खुर्द, उडणीदिगर, शेवगे बु.।। या गावांचा समावेश आहे. यापैकी शेवगे प्र.ब., रामनगर, इंधवे, उडणीदिगर, शेवगे बु.।। या सहा गावांना खाजगी विहीर अधिग्रहण सुचविण्यात आले आहे. त्यासाठी 2.28 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमठाणे, पोपटनगर, चोरवड, लोणी खुर्द, लोणी बु.।।, वाघरे, शिवरे दिगर, शेळावे खुर्द, शेळावे बु.।।, मेहू, हनुमंतखेडा या 10 गावांना नळ योजना दुरुस्ती करण्याचे आराखडय़ात सुचविण्यात आले आहे. त्यासाठी 10 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर हिवरखेडा बु.।। या गावाला तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना सुचविली असून, त्यासाठी तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुस:या टप्प्यात 17 गावांसाठी 17 योजनेत 15 लाख 28 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पळासखेडा बु.।। या गावासाठी नळ योजना दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. त्यासाठी 10 लाखांचा आणि वडगाव प्र.अ. या गावाला खाजगी विहीर अधिग्रहणसाठी एक लाख 10 हजारांचा खर्च कृती आराखडय़ात सुचविण्यात आला आहे. पारोळा पंचायत समिती कार्यालयाकडे वडगाव प्र.अ.जिराळी, आंबापिंप्री, मोरफळ, मोरफळी या गावांचे विहीर अधिग्रहणासाठी प्रस्ताव आले आहेत. (वार्ताहर)