टास्क फोर्समध्ये डॉक्टरांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:58+5:302021-05-14T04:16:58+5:30
या कृती दलाचे अध्यक्ष अधिष्ठाता असून, या कृती दलात उपअधिष्ठाता तथा शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. मारुती पोटे, औषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख ...
या कृती दलाचे अध्यक्ष अधिष्ठाता असून, या कृती दलात उपअधिष्ठाता तथा शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. मारुती पोटे, औषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. भाऊराव नाखले, डॉ. विजय गायकवाड, कान-नाक-घसा विभागाचे डॉ. हितेंद्र राऊत, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रसन्ना पाटील, दंत शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, विकृतीशास्त्र विभागाचे डॉ. भारत घोडके, रेडिओलॉजी विभागाचे डॉ. उत्कर्ष पाटील, जनऔषध वैद्यकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगिता बावस्कर, बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इमरान तेली यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे.
म्युकरमायकोसिस आजाराविषयी माहिती अद्ययावत ठेवणे याबाबत औषध वैद्यकशास्त्र विभाग, औषधी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी औषधशास्त्र विभाग, नोंदी ठेवण्याची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र, उपचारासाठी कान-नाक-घसा, दंतशास्त्र, नेत्रशल्य विभागाकडे देण्यात आली आहे. विषाणूंचा अभ्यास करण्याची जबाबदारी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडे देण्यात आली आहे.