असोद्यात संतप्त प्रवाश्यांनी दीडतास बससेवा रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 08:16 PM2018-08-31T20:16:28+5:302018-08-31T20:18:35+5:30

आगारातून असोदा मार्गावरील बसफेऱ्या कमी झाल्याने संतप्त विद्यार्थी तसेच प्रवाशांकडून असोदा बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९़३० वाजता बसरोको आंदोलन करण्यात आले़

An incompetent passengers stopped the bus service | असोद्यात संतप्त प्रवाश्यांनी दीडतास बससेवा रोखली

असोद्यात संतप्त प्रवाश्यांनी दीडतास बससेवा रोखली

Next
ठळक मुद्देबसफेऱ्या कमी केल्याने असोद्यात विद्यार्थी प्रवाशी झाले संतप्तदीड तास रोखून ठेवली होती बसआंदोलनामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांची कोंडी

जळगाव- आगारातून असोदा मार्गावरील बसफेऱ्या कमी झाल्याने संतप्त विद्यार्थी तसेच प्रवाशांकडून असोदा बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९़३० वाजता बसरोको आंदोलन करण्यात आले़ तब्बल दीड तास बस रोखून ठेवण्यात आली होती़ यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
आसोदा मार्गावरील स्पेशल बसफेºया कमी करणे, पुर्वीचे वेळापत्रक बदलल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांना फटका बसत आहे. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत होती़ अखेर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता संतप्त विद्यार्थ्यांनी आसोदा बसस्थानकावर बसेस रोखल्या. दरम्यान, घटनेची माहिती देवूनही आगार प्रशासनाचे पदाधिकारी न पोहचल्याने प्रवाशांनी आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा घेतला. या दरम्यान कानसवाडा, भादली, शेळगाव मार्गावरील आठ बसेस बसस्थानकात जमल्या.

Web Title: An incompetent passengers stopped the bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.