जळगाव-वाडे मुक्कामी बसअभावी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 06:43 PM2019-02-24T18:43:11+5:302019-02-24T18:44:51+5:30
जळगाव-वाडे मुक्कामी बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी २५ पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
भडगाव : जळगाव-वाडे मुक्कामी बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी २५ पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
सूत्रांनुसार, जळगाव ते वाडे मुक्कामी व सायंकाळची बस फेरी सुरू करावी. भडगाव ते वाडे सकाळसह बसफेऱ्या नियमीत सुरू ठेवाव्यात या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथील ग्रामपंचायत सदस्या उषाबाई अशोक परदेशी या प्रवाशांसह भडगाव तहसील कार्यालयासमोर २५ रोजी सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत निवेदनाच्या प्रती भडगाव बसस्थानक, पाचोरा आगारप्रमुख, राज्याचे परिवहन मंत्री आदींना दिल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,जळगाव ते वाडे एस.टी.बस फेºया सुरू कराव्यात या मागणीनुसार मुक्कामी व सायंकाळ अशा दोन बस फेºया सुरूही झाल्या होत्या. या बस सेवेमुळे वाडे, टेकवाडे बुद्रूक, नावरे, बांबरुड प्र.ब., सावदे, घुसर्डी, लोण, बोरनार, निंभोरा, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, कोठली, दलवाडे, नवे वडधे, जुने वडधे, भडगाव आदी तालुक्यातील १७ ते १८ गावांच्या नागरिकांची प्रवासासाठी मोठी सोय झाली होती. मात्र पाचोरा आगाराने ही बस काही वर्षापासून अचानक बंद केलेली आहे. त्यामुळे जळगावी जाणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बस सुरू करण्याबाबत वारंवार निवेदनेही दिली. मात्र एस.टी.महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. भडगाव पंचायत समितीच्या ३१ जानेवारी २०१९ रोजी आमसभेतही ही बस सुरू करण्याबाबत मागणी मांडण्यात आली. पाचोरा आगारप्रमुख वाणी यांनी आठवड्यात जळगाव ते वाडे बस मुक्कामे सुरू करू, असे आश्वासनही आमदार किशोर पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासमोर दिलेले आहे.