गव्हावरील आयात शुल्क वाढीने ग्राहकांच्या खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:01 PM2019-05-15T12:01:25+5:302019-05-15T12:02:02+5:30

१० टक्के शुल्क वाढ

Increase in import duty on wheat to consumers | गव्हावरील आयात शुल्क वाढीने ग्राहकांच्या खिशाला झळ

गव्हावरील आयात शुल्क वाढीने ग्राहकांच्या खिशाला झळ

googlenewsNext

जळगाव : विदेशातून आयात होणाऱ्या गव्हावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने १० टक्क्याने वाढ केल्याने देशातच पिकणाºया गव्हाच्याही भावात २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे. पीठ (आटा), रवा, मैदा मिलसाठी वापरात येणाºया विदेशी गव्हावर ही शुल्क वाढ असली तरी त्याचा घरगुती वापराच्या गव्हाच्या भावावरही परिणाम होऊन ग्राहकांच्या खिशाला त्याची झळ बसत आहे. दरम्यान, सध्या तयार पीठ, रवा, मैदा यांच्या भावात अद्याप कोणतीही वाढ नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
तयार पीठ (आटा), रवा, मैदा मिल या ठिकाणी कच्चा माल म्हणून विदेशातून येणाºया गव्हाचा वापर केला जातो. यात खास करून आॅस्ट्रेलियातून येणाºया गव्हाला अधिक पसंती दिली जाते. आॅस्ट्रेलियातून येणाºया या गव्हावर पूर्वी २० टक्के आयात शुल्क आकारले जात असे.
मात्र आता केंद्र सरकारने त्यात १० टक्क्याने वाढ केली असून हे आयात शुल्क थेट ३० टक्के करण्यात आले आहे. यामुळे साधारण १९०० ते २००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या या गव्हाच्या भावात थेट २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन तो २१०० ते २२०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला.
भारतीय गव्हाला वाढली मागणी
विदेशातून येणाºया गव्हाच्या भावात वाढ झाल्याने सध्या बाजारात येणारा मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेशातील नवीन गव्हाला पीठ मिल मालकांकडून मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या देशी गव्हाच्याही भावात २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे. यात गेल्या आठवड्यात २१०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव सध्या २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. या सोबतच लोकवन गव्हाचे भाव २००० ते २१०० रुपये प्रती क्विंटलवरून २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसी गव्हाचे भाव ३६०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटलवरून ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
आणखी भाववाढीची शक्यता
सध्या बाजारात नवीन गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने आयात शुल्क वाढले तरी केवळ भावात थोडीफार वाढ झाली आहे, मात्र नवीन गव्हाची आवक कमी झाल्यानंतर महिना-दीड महिन्यात भारतीय गव्हाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

Web Title: Increase in import duty on wheat to consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव