जलपातळी वाढण्यासाठी नद्यांचे लोकसहभागातून खोलीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 07:25 PM2018-06-10T19:25:41+5:302018-06-10T19:25:41+5:30

यावल तालुक्यातील डांभुर्णी, उंटावद, दोनगाव परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभागातून परिसरातील नद्यांचे खोलीकरण सुरू झाले असून यासाठी शेतकऱ्यांनी हिरीरीने पुढकार घेतला आहे.

 To increase the level of water, the depth of the water sharing community started | जलपातळी वाढण्यासाठी नद्यांचे लोकसहभागातून खोलीकरण सुरू

जलपातळी वाढण्यासाठी नद्यांचे लोकसहभागातून खोलीकरण सुरू

Next
ठळक मुद्दे डांभुर्णी परिसरातील शेतकरी एकवटले लोकवर्गणी जमा करून नद्यांच्या नांगरटीला सुरूवात कार्यस्थळी शेतकºयांसह तरुणांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
डांभुर्णी, ता. यावल, दि.१० : डांभुर्णी, उंटावद, दोनगाव शिवारातील नद्यांचे खोलीकरण करण्यासाठी डांभुर्णी येथील शेतकºयांनी एकत्रीत येऊन नांगरटी सुरू केली असून या उपक्रमाचा फायदा पावसाळ्यात भूगर्भातील जलपातळी वाढण्यात होणार आहे.
डांभुर्णी येथील शेतकºयांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून गावातील दोन्ही बाजुच्या नदीवर नांगरटीस रविवारपासून सुरुवात केली.
सातत्याने घटणाºया जलपातळीत वाढ होण्याच्या संदर्भात डांभुर्णी गावातील मढी येथे नुकतीच चर्चा करुन लोकांनी पुढाकार घेऊन ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेसह जलसंधारण कामाकरिता लोकवर्गणी जमा केली. या करीता डॉ. विवेक चौधरी, सरपंच पुरुजीत चौधरी, ग्रा.पं. सदस्य संजीव कोळी, बाळू पाटील यांनी आपले स्वत:चे विनामोबदला ट्रॅक्टरसह वर्गणीही दिली. तर समाधान कोळी, विजय कोळी, लढे, प्रविण भंगाळे, पिंटु भंगाळे, गोकुळ कोळी, महेश पाटील , किरण कचरे, भोजराज फालक, निलेश चौधरी, मनोज पाटील, विकास भंगाळे, डॉ. प्रशांत भंगाळे, विजय भंगाळे, चेतन सरोदे, जितू मेंबर, सतीश नारखेडे आदींनी लोकवर्गणी जमा करून नद्यांच्या खोलीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.
बेसुमार उपशामुळे दरवर्षी भू गर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यावर उपाययोजना म्हणून पाण्याची साठवण करून भविष्यात शेतीसाठीदेखील पाण्याची अडचण भासू नये, यासाठी गावातून जाणा-या नाल्यालाही नांगरण्याचे काम सुरू केले असून यामुळे नाल्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन ते पुढे जमीनीत जिरेल व परिसरातील खोल गेलेली पाण्याची पातळी काही प्रमाणात का होईना वर येईल. त्यामुळे भविष्यात बागायती शेती करणे सोपे होईल या विधायक उद्देशाने डॉ. विवेक चौधरी व शेतकºयांनी नद्यांच्या नांगरटीचे हे काम सुरू केले आहे.
 

Web Title:  To increase the level of water, the depth of the water sharing community started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.