सैनिकी शाळांमधील मराठी टक्का वाढावा
By ram.jadhav | Published: December 12, 2017 11:48 PM2017-12-12T23:48:05+5:302017-12-12T23:49:48+5:30
खान्देशातील मुलांनी पुढे यावे : अथर्व भोकरे देशात ६० वा
राम जाधव आॅनलाईन लोकमत दि़ १३ -
जळगाव : बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये करिअर करण्याच्या नानाविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत़ मात्र त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ पालकांनीही याबाबत माहिती जाणून घेऊन आपल्या पाल्यांना शिस्तबद्ध व विविध कलागुणांचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळेल यासाठी सैनिकी शाळांना प्राधान्य द्यावे़ येथे मिळणाºया दर्जेदार व गुणात्मक शिक्षणासाठी आपल्या मुलांना या शाळांमध्ये पाठविण्याची तयारी करावी, असे मत नुकतीच एनडीए-एनएची परीक्षा पास झालेल्या अथर्व अनिल भोकरे याने व्यक्त केले आहे़
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येते़ कठीण चाचणी पातळी पार करून या परीक्षेत अथर्वने १८०० पैकी ८४२ गुण मिळवत देशात ६० वा क्रमांक मिळविला़ तसेच सिंहगड येथील एका खासगी महाविद्यालयात आयटी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षालाही अथर्वने प्रवेश घेतलेला आहे़ यावर्षी जळगाव जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांची निवड या परिक्षेत झाली आहे़
कशी मिळवावी माहिती़़़
महाराष्ट्रात सैनिकी प्रशिक्षण शाळा सातारा सैनिकी शाळा म्हणून प्रसिद्ध आहे़ या शाळेत सहावी आणि नववीमध्ये चाचणी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश मिळविता येतो़ याबाबत माहितीसाठी इंटनेटवर अनेक चांगल्या प्रकारची संकेतस्थळे आहेत़
अथर्वचे प्राथमिक शिक्षण चाळीसगावसारख्या ग्रामीण भागात झाले़ त्यानंतर जळगाव येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच सैनिकी शाळेच्या चाचणीची तयारी केली व इयत्ता नववीमध्ये अथर्वने सातारा सैनिकी शाळेत प्रवेश मिळविला़ विशेष म्हणजे त्याचे वडील अनिल भोकरे व काका व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांचेही शिक्षण याच सैनिकी शाळेत झालेले आहे़ काकांप्रमाणेच त्याचेही नौदलात जाण्याचे स्वप्न
काय असते एनडीए-एनए परीक्षा़़
बारावी सुरू असतानाच वयाच्या १७ व्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ही परीक्षा ४ वेळा देता येते़ ही परीक्षा वर्षातून २ वेळा होते़ गणित ३०० व सामान्यज्ञान ६०० अशी ही ९०० गुणांची प्राथमिक परीक्षा असते़ यामध्ये पात्र झाल्यावर एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) मध्ये ५ दिवस ९०० गुणांची फेरी अशी एकूण १८०० गुणांची संपूर्ण चाचणी परीक्षा होते़ यातून मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते़ अशी संपूर्ण एनडीए-एनए ची चाचणी परीक्षा असते़