दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:52 PM2019-08-26T12:52:16+5:302019-08-26T12:53:48+5:30
जळगाव : म्हशीच्या दूधाच्या खरेदी दरात वाढ न करताच जिल्हा दूध संघातर्फे ‘विकास’ दुधाच्या विक्री दरात मात्र लिटरला २ ...
जळगाव : म्हशीच्या दूधाच्या खरेदी दरात वाढ न करताच जिल्हा दूध संघातर्फे ‘विकास’ दुधाच्या विक्री दरात मात्र लिटरला २ रूपये वाढ केली आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात मात्र १ आॅगस्टपासून लिटरला २ रूपये वाढ करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाने केलेली दूध दरवाढ रविवार २५ आॅगस्टपासून लागू झाली आहे. त्यात सर्वच प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे विकास फुल क्रिम मिल्क (गोल्ड दूध) ५४ रूये, विकास प्रमाणित दूध ४२ रूपये, विकास स्मार्ट (गायीचे दूध) ४० रूपये, विकास टोण्ड (ताजा) दूध ३८ रूपये, विकास टोण्ड ४५ रूपये व विकास स्मार्ट (गाय) १००० मिली ३९ रूपये प्रतिलिटर झाले आहे.
म्हशीच्या खरेदी दरात वाढ नाही
गायीच्या खरेदी दरात १ आॅगस्ट पासून २ रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आलेली असली तरीही म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात गेल्या दोन महिन्यांपासून वाढ केलेली नाही. ६ रूपये फॅट प्रमाणेच खरेदी केली जात असताना विक्री दरात मात्र वाढ करण्यात आली आहे.
एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांसाठी सरकी ढेपची ६५ किलोची गोणी २५०० रूपयांना घ्यावी लागत आहे.
तर कोरडा चाराही उपलब्ध नाही. पाऊस झाला असल्याने हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. त्यावर गरज भागविली जात आहे.