मविप्र"मध्ये पोलिस बंदोबस्त वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:58+5:302021-04-04T04:16:58+5:30
जळगाव : मविप्र प्रकरणी तहसीलदारांना न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहे. परंतु नरेंद्र पाटील गटाकडून त्याची चुकीचा ...
जळगाव : मविप्र प्रकरणी तहसीलदारांना न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहे. परंतु नरेंद्र पाटील गटाकडून त्याची चुकीचा अर्थ लावून दिशाभूल केली जात आहे, संभाव्य धोका लक्षात घेता संस्थेवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा अशी मागणी नीलेश भोईटे यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याकडे केली.
''मविप्र''च्या ताब्याबाबत न्यायालयाने १५ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. नीलेश भोईटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोईटे गटाकडील ताबा परत घेवून तो पाटील गटाला देण्यात यावा. ही विनंती न्यायालयाने रद्द करीत याबाबत रिव्हीजन अर्ज डिस्पोज ऑफ केला होता. तसेच न्यायालयाने तहसीलदारांना पुन्हा सर्वांना नोटीस देवून नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. परंतु नरेंद्र पाटील यांच्या गटाकडून सोशल मिडीयावर पाटील गटाला ताबा दिला आहे असा कांगावा केला जात आहे. तसेच मविप्रच्या आवारात सहकार खात्याचे निवडणुक अधिकारी व इतर संचालकांना येण्या मनाई करण्यात आली आहे. अशी परिस्थिती असताना पाटील गटाकडून बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे संस्थेला दिलेला बंदोबस्त वाढवून पाटील गटातील सदस्यांना समज देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.