कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाळ निर्यातीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:44 PM2020-03-16T12:44:56+5:302020-03-16T12:45:11+5:30
जळगाव : कोरोनामुळे कोठे घसरण तर कोठे बाजार अस्थिर होत असताना दुसरीकडे देशातून निर्यात होणाऱ्या डाळींच्या प्रमाणात वाढ होत ...
जळगाव : कोरोनामुळे कोठे घसरण तर कोठे बाजार अस्थिर होत असताना दुसरीकडे देशातून निर्यात होणाऱ्या डाळींच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे निर्बंध येण्याच्या भीतीने विविध देश डाळींची आगाऊ मागणी करीत त्यांचा साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून निर्यातीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. े सध्या दररोज जळगावातून १८० ते २२५ टन डाळींची निर्यात होत आहे.
कोरोनामुळे सध्या जागतिक बाजार पेठेला चांगलेच वेढले असून त्यामुळे शेअर बाजारात घसरण होेण्यासह सोने-चांदी, इंधनाच्या भावातही घसरण होत आहे. सोबतच भारतीय रुपयादेखील गडगडत आहे. मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरच डाळींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जळगावात ६० ते ६५ दालमिल असून त्यामधून तयार झालेल्या डाळी दररोज येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. एरव्ही साधारण १५० ते २०० टन डाळ दररोज अमेरिका, कॅनडा, युरोप, आॅस्ट्रेलिया यासह वेगवेगळ््या देशात निर्यात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे विविध देशांमधील मालाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने हे देश डाळींची वाढीव खरेदी करू लागले आहे. चीनमधून जगभर पसरत असलेल्या कोरोनामुळे विविध देश धास्तावले असल्याने खाद्य पदार्थांची चणचण नको म्हणून त्यांचा साठा करीत असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यात डाळदेखील आवश्यक असल्याने भारताकडून खरेदी होणाºया डाळींचा साठा करण्यावर हे देश भर देत आहेत. सध्या चीनमधील बाजारपेठ कोलमडल्याने तेथून माल खरेदी करणे शक्य नसल्याचे लक्षात घेत भारताकडे खरेदीचा ओढा वाढत आहे. परिणामी येथील डाळीलादेखील चांगलीच मागणी वाढली आहे.
कोरोनामुळे डाळींच्या आयात-निर्यातीवर कधी निर्बंध येतील याची शाश्वती नसल्याने विविध देशांकडून डाळींची मागणी वाढली आहे. त्यामुळे डाळींची निर्यातदेखील वाढत आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव.