डाळीतील तेजी वाढवतेय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:23 PM2018-11-17T22:23:53+5:302018-11-17T22:24:40+5:30

गेल्या वर्षापासून कमी असलेले डाळीचे भाव यंदा पुन्हा एकदा वाढू लागले

The increase in the pulse is the worry | डाळीतील तेजी वाढवतेय चिंता

डाळीतील तेजी वाढवतेय चिंता

Next
ठळक मुद्देगव्हाच्या भावातही वाढतांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव स्थिर

विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या वर्षापासून कमी असलेले डाळीचे भाव यंदा पुन्हा एकदा वाढू लागले असून यामुळे दोन वर्षापूर्वीच्या चिंतेची पुन्हा ग्राहकांना आठवण होऊ लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी तूर डाळ २०० रुपये प्रती किलोवर पोहचली होती. त्यामुळे ग्राहक चांगलेच हवालदिली झाले होते. मात्र गेल्या वर्षी डाळींचे भाव कधी नव्हे एवढ्या प्रमाणात कमी झाले की, शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. मात्र यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. यंदा मात्र पुन्हा डाळींचे भाव वाढतच असून तीन आठवड्यांपासून ही चिंता भेडसावत आहे. त्यात यंदा गहू, ज्वारी, बाजरीचेही भाव वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे.
जळगावच्याबाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. डाळींची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सलग तिसऱ्या आठवड्यात डाळींच्या भावात वाढ झाली आहे. तांदूळ स्थिर असल्याने तेवढा दिलासा असल्याचे मानले जात आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव तीन आठवड्यापासून वाढत आहे. यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाºया काळातच उडीद, मूग तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरींच्या भावात वाढ सुरू आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत आहे. या आठवड्यात तर गव्हाचेही भाव वाढले.
गेल्या आठवड्यात ७४०० ते ७८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही वाढ होऊन ती ६४०० ते ६८०० रुपयांवरून ६५०० ते ६९०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यात ६२०० रुपये प्रती क्विंटलवर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६५०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ६००० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवरून ६६०० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहे.
चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडिदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
गव्हाच्या भावातही वाढ
अनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ््यानंतर आता पुन्हा दिवाळीच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गव्हाचे भाव स्थिर आहेत. मात्र या आठवड्यात त्यात वाढ होऊन १४७ गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २६५० ते २७५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसीचे भाव ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.
ज्वारीचे भाव २००० ते २३०० रुपये प्रती क्विंटल झाले असून बाजरी २३०० रुपये प्रती क्विंटल, दादर ३००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.
तांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव स्थिर आहेत.

Web Title: The increase in the pulse is the worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.