डिजिटल शाळांसोबत विद्याथ्र्याच्या गुणवत्ता वाढीवर भर - जि.प. सीईओ कौस्तुभ दिवेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:25 PM2017-07-19T12:25:01+5:302017-07-19T12:25:01+5:30
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये करण्यात येत असलेले प्रय}, शालेय पोषण आहाराचा मुद्दा, शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांबाबत चर्चा केली
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्याथ्र्याना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून डिजिटल अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो लवकरच शाळांमध्ये शिकविला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिवेगावकर यांनी पहिल्यांदाच ‘लोकमत’शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये करण्यात येत असलेले प्रय}, शालेय पोषण आहाराचा मुद्दा, शिक्षक बदली प्रक्रिया व भविष्यात जि.प.च्या माध्यमातून राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यांच्याशी साधलेला संवाद असा..जि.प. शाळेच्या शिक्षकांनीच तयार केला अभ्यासक्रमदिवेगावकर म्हणाले की, डिजिटल शाळा ंआणि विद्याथ्र्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी कोणताही आर्थिक खर्च करण्यात आला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यासाठी विविध विषयात तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांच्या समित्या तयार करण्यात आल्या. त्यांनीच अभ्यास करुन अभ्यासक्रम तयार केला आहे. तो अभ्यासक्रम विद्याथ्र्याना शिकविण्यात येणार आहे. डिजिटल शाळांमध्ये केवळ वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण करायचा या भावनेने शिकविणा:या शिक्षकांची गरज नाही. विद्याथ्र्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रय} व्हावेत. शिक्षणाद्वारे उद्याचा चांगला नागरिक घडला पाहिजे. अधिकारांचे विकेंद्रीकरण स्थानिक पातळीवर नागरिकांना अनेक समस्या असतात. मात्र अनेकदा नागरिक लहान-लहान समस्या घेऊन थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. त्यात त्यांचे वेळ व पैसा खर्च होत असतो. स्थानिक पातळीवरच त्यांच्या समस्या मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारांचे विक्रेंदीकरण करण्यात आले आहे. शिक्षकांनी मानसिकता बदलावीदिवेगावकर म्हणाले, यंदा शिक्षक बदली प्रक्रियेत शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार अवघड व सर्वसाधारण क्षेत्र असे दोन भाग तयार केले. मात्र अनेक शिक्षकांकडून अवघड क्षेत्रात जायला नकार दिला जातो. मात्र राज्यात गडचिरोली, नंदुरबार अशा दुर्गम भागातदेखील शिक्षक चांगले काम करत आहेत. जर या अवघड क्षेत्रात शिक्षक जाणार नाहीत. तर त्या ठिकाणी कोण काम करणार? शिक्षकांनी आपल्या मानसिक तेत बदल करण्याची गरज आहे. साने गुरुजी हे मूळ कोकणातील. असे असतानाही ते जळगाव जिल्ह्यात आले. अमळनेर येथे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे.