जळगावच्या बाजारपेठेत रबी ज्वारीच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:22 PM2018-11-29T12:22:26+5:302018-11-29T12:23:21+5:30

बाजारगप्पा : या आठवड्यात ज्वारीचे भाव २०० प्रती क्विंटलने वाढून ३००० रुपये प्रती क्विंटलवरून ३२०० प्रती क्विंटल झाले आहेत.

Increase in Rabi Jowar prices in Jalgaon market | जळगावच्या बाजारपेठेत रबी ज्वारीच्या भावात वाढ

जळगावच्या बाजारपेठेत रबी ज्वारीच्या भावात वाढ

googlenewsNext

- विजयकुमार सैतवाल, (जळगाव )

बाजारपेठेमध्ये रबी ज्वारीची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात ज्वारीचे भाव २०० प्रती क्विंटलने वाढून ३००० रुपये प्रती क्विंटलवरून ३२०० प्रती क्विंटल झाले आहेत. या सोबतच तूर डाळीच्याही भावात वाढ झाली आहे. नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, गहू, ज्वारी, बाजरी यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात झालेली वाढ थांबून या सर्वांचे भाव स्थिर आहे. 

यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन घटण्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे.  रबी हंगामात लागवड होणाऱ्या ज्वारीच्याही उत्पादनावर परिणाम होणार असल्याची शक्यता असल्याने तिचे भाव आतापासूनच वाढू लागले आहे. या आठवड्यात थेट २०० रुपये प्रती क्विंटलने ज्वारीच्या भावात वाढ होऊन ३२०० प्रती क्विंटलवर पोहोचली आहे. आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला होत असलेली वाढ या आठवड्यात स्थिर झाली. यात केवळ तूर डाळीच्या भावात वाढ झाली आहे.

जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर व बुलडाणा जिल्ह्यामधून मुगाची आवक होते, तर उडिदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक होत असते, मुगाच्या डाळीचे भाव या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल स्थिर आहे. उडिदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४००  रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत, तर तूरडाळीच्या भावात वाढ होऊन ती ७२०० ते ७६००  रुपये प्रती क्विंटलवर पोहोचली आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडिदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत.

नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, छत्तीसगड, मध्यप्रदेशसह गोंदिया, तुमसर या भागातून नवीन तांदूळ येऊ लागला आहे. नवीन चिनोर तांदळाचा भाव ३००० रुपये प्रती क्विंटल असून जुन्या चिनोर तांदळाचे भाव ३४०० रुपये प्रती क्विंटल आहे. सध्या आवक कमी असली तरी पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.

दिवाळीच्या काळात मागणी वाढल्याने गेल्या आठवड्यात गहू १०० रुपये प्रती क्विंटलने महागला. मात्र या आठवड्यात हे भाव स्थिर आहेत. १४७ गहू  २६५० ते २७५०  रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. तसेच  लोकवन गहू  २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह   मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.बाजरीचे भाव देखील २३०० रुपयांवर स्थिर आहेत. इतर जिल्ह्यांमधून दाळींची आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Increase in Rabi Jowar prices in Jalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.