गर्दी टाळण्यासाठी दुकानांची वेळ वाढवा - जिल्हाधिका-यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 09:15 PM2020-03-25T21:15:24+5:302020-03-25T21:15:39+5:30

घरपोहच सेवा देण्यावर प्राधान्य द्या

Increase store hours to prevent congestion - District Collector Suggestions | गर्दी टाळण्यासाठी दुकानांची वेळ वाढवा - जिल्हाधिका-यांच्या सूचना

गर्दी टाळण्यासाठी दुकानांची वेळ वाढवा - जिल्हाधिका-यांच्या सूचना

googlenewsNext

जळगाव : किराणा माल, धान्य खरेदी व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व किराणा व्यापाºयांनी आपली प्रतिषठाने सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत खुले ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहरातील व्यापाºयांना दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व लॉक आऊट असल्याने जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागल्याने ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात या विषयी चर्चा करण्यासाटी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एकता रिटेल किराणा असोसिएशन व दाणाबाजार व्यापारी असोसिएशन यांच्या पदाधिकाºयांसोबत बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. या वेळी  एकता रिटेल किराणा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार ललित बरडिया, अनिल कांकरिया, नितीन रेदासनी, धर्मेंद्र बोºहा, दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया उपस्थित होते.

घरपोहचला प्राधान्य द्या
बाहेर पडणाºयांची गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांनी शक्य असल्यास जास्तीत जास्त घरपोहच सामान देण्याचा प्रयत्न करा  असे सांगत कुठल्याही व्यवसायिकाने परिस्थितीचा लाभ घेत काळाबाजार करण्याचा प्रयत्न अजिबात करु नये अन्यथा अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या वेळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला.

ओळखपत्र द्या
ज्या व्यवसायिकांना शक्य असेल त्यांनी आपापल्या प्रतिष्ठानातील आपल्या सहकाºयांना प्रतिष्ठानाचे ओळखपत्र, त्यांचे व्ययक्तिक आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड व प्रतिष्ठानाच्या शॉप अ‍ॅक्ट लायसेन्सची झेरॉक्स सोबत ठेवण्याबाबत सांगावे, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या.  असोसिएशनच्यावतीने आपल्या प्रतिष्ठानचे नाव टाकून ओळखपत्र दिल्यास दुकानांवरील काम करणाºया व्यक्तींना पोलीस तपासणीचा त्रास होणार नाही, असेही जिल्हाधिकाºयांनी सूचित केले.

‘कोरोना’पुढे करोडोंचा उपयोग नाही
संचारबंदी व लॉक आऊटमुळे कोणीही घाबरण्याची गजर नाही, मात्र तरीदेखील नागरिक खरेदी करीत आहे. गर्दी टाळणे महत्त्वाचे आहेच.  सोबतच अशा परिस्थितीत नागरिकांना तुमची आवश्यकता असण्याची हीच वेळ असल्याने व्यापाºयांनी प्रतिष्ठान बंद ठेऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी करोडो रुपये कमविले तरी कोरोनाचा रुग्ण पाहिल्यास त्यापुढे करोडो रुपये काहीही कामाचे राहणार नाही, त्यामुळे कोणीही गैरफायदा घेऊ नये, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी या वेळी केले.

आरोग्याच्या दृष्टीने प्रतिष्ठानमधील प्रत्येक सहकाºयाला प्रत्येकी दोन मास्क, देऊन साबण अथवा हॅण्ड वॉशने हात धुण्यास सांगावे किंवा सॅनिटाईज करण्यास सांगावे, प्रतिष्ठानमध्ये ग्राहकांना एकमेकांपासून कमीत-कमी एक मीटर अंतर ठेवावे, दुकानातील सहकाºयाला शारिरीक त्रास जाणवत असल्यास त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवावे, होलसेल सप्लायरकडून आपणास वेळोवेळी पुरवठा व्यवस्थित होईल असे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधि-यांनी या वेळी दिल्या. तसेच  आपापल्या प्रतिषठानामध्ये  गर्दीचे नियोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या-त्या प्रतिष्ठानचीच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Increase store hours to prevent congestion - District Collector Suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.