जिल्ह्यात घरफोडींच्या गुन्ह्यात वाढ

By admin | Published: March 12, 2017 12:39 AM2017-03-12T00:39:46+5:302017-03-12T00:39:46+5:30

महानिरीक्षकांची कबुली : सीमेलगत राज्यांच्या अधिकाºयांची पुन्हा बैठक घेणार

Increased burglary crime in the district | जिल्ह्यात घरफोडींच्या गुन्ह्यात वाढ

जिल्ह्यात घरफोडींच्या गुन्ह्यात वाढ

Next

जळगाव : जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याची कबुली देत या घटना रोखण्यासह घडलेल्या घटना उघडकीस आणण्यासाठी सक्रीय झालेल्या टोळ्यांची माहिती काढली जाणार आहे तसेच सीमेलगत राज्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची पुन्हा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांनी दिली.
 वार्षिक तपासणीच्या निमित्ताने चौबे जळगाव दौºयावर आले असून शनिवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर,अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, परिविक्षाधीन आयपीएस मनीष कलवानिया, उपअधीक्षक महारु पाटील, डॉ.संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
पथक परराज्यात पाठविणार
सिगारेट चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली गाडी पुण्यात आढळून आली आहे, तसेच गेल्या वर्षी व्यापाºयाची ५४ लाख रुपयांची बॅग कारमधून लांबविल्याच्या गुन्ह्यात पोलीस अंतिम टप्प्यापर्यंत पोहचले होते, मात्र आरोपी तेथून निसटला होता. या दोन्ही गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे तसेच परराज्यात पाठविण्याच्या सूचना चौबे यांनी पोलीस अधीक्षकांना केल्या.
२०१६ मध्ये २७१ घरफोड्या
घरफोडीच्या गुन्ह्यात यंदा ३९ ने वाढ झाली आहे. २०१५ मध्ये २३२ गुन्हे दाखल होते तर २०१६ मध्ये हा आकडा २७१ वर पोहचला आहे. गेल्या वर्षी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही चांगले होते, मात्र २०१६ मध्ये हे प्रमाण घटल्याची कबुली चौबे यांनी दिली. घरफोडी वगळता अन्य गुन्ह्यात घट झाल्याचे ते म्हणाले. घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी दिवसा व रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
अमळनेरच्या पोलीस निरीक्षकावर कारवाई अटळ
एमपीडीएची कारवाई झालेला अमळनेर येथील वाळू माफिया घनश्याम उर्फ श्यामकांत जयवंतराव पाटील (वय ३१ रा.न्यू पटवारी कॉलनी, अमळनेर) याच्या पलायन प्रकरणात अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यासह दोषी असलेल्या कर्मचाºयाविरुध्द कठोर कारवाई केली जाईल,अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांनी पत्रकारांना दिली. घनश्याम याच्याविरुध्द जिल्हाधिकाºयांनी एमपीडीएची कारवाई करुन त्याला स्थानबध्द करण्याचे आदेश दिले होते, मात्र तत्पूर्वीच तो अमळनेरातून गायब झाल्याने पोलीस दलाची नाचक्की झाली होती. यात प्रथमदर्शीनी दोषी आढळल्याने निरीक्षक वाघ यांची उचलबांगडी करुन नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आठच दिवसात त्यांना पुन्हा अमळनेरला पाठविण्यात आले होते. त्यामुळे ही कारवाई देखावा होता का? असे चौबे यांना विचारले असता, वाघ यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्तच असून चाळीसगाव परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते का?, घेतले असेल तर त्याला कोणी सोडले, की ताब्यात घेण्याआधी ही माहिती कोणी लीक केली? यात कोणा-कोणाचा सहभाग आहे? यासह सर्वांगाने चौकशी केली जात आहे. ठाकूर यांचा अहवाल आल्यानंतर वाघ व अन्य कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल असे चौबे म्हणाले. अमळनेर येथे निवडणूक काळात झालेली दंगल, डॉक्टर दाम्पत्याच्या मुलाचे अपहरण यासह पूर्वी झालेल्या चूकांचीही दखल घेण्यात आलेली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे चौबे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Increased burglary crime in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.