कोविड निदान प्रयोगशाळेची क्षमता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:32+5:302021-04-02T04:16:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने कोरोना निदान प्रयोगशाळेला ऑटो एक्स्टॅक्टर मशिन उपलब्ध करून दिल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने कोरोना निदान प्रयोगशाळेला ऑटो एक्स्टॅक्टर मशिन उपलब्ध करून दिल्यानंतर आता प्रयोगशाळेची क्षमता वाढली असून दिवसाला ११०० पर्यंत अहवाल देणे शक्यत होत आहेत. आधी ओढून ताणून ८०० अहवाल दिवसाला तपासले जात होते.
गेल्या काही दिवसांपासून तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे प्रयोगशाळेची क्षमता मात्र, कमी असल्याने अहवाल प्रलंबित राहत होते. यासाठी आवश्यक असणारे ऑटो एक्स्टॅक्र हे मशिन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. यात जिल्हा नियोजनकडून तातडीने हे मशिन अखेर उपलब्ध करून देण्यात आले. यातही प्रशिक्षणासाठी बाहेरून कुणीच यायला तयार नसल्याने अखेर प्रयोगशाळेत सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले आणि सहकार्यांनी स्थानिक पातळीवरच योग्य प्रशिक्षणाचे नियोजन करून अखेर या मशिनचा वापर सुरू केला असून त्यामुळे अहवाल तपासणी क्षमता वाढविण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित अहवालांची संख्याही कमी होणार आहे.
डॉ. इंगोले रुजू
सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा प्रयोगशाळेत रूजू झाले आहेत. कोविड बाधित असलेल्या डॉक्टरांपैकी बऱ्यापैकी डॉक्टर हे कर्तव्यावर परतले आहेत. त्यामुळे काहीशी चिंता मिटली आहे.