जळगावात कैरीची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:29 PM2019-04-19T12:29:03+5:302019-04-19T12:30:47+5:30
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कैरीचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांनी कमी
जळगाव : वाढत्या उन्हासोबतच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबूसह भाजीपाल्याची आवक घटत असताना कैरीची आवक वाढली आहे. एकीकडे भाजीपाल्याचे भाव वाढत असताना कैरीचे भाव कमी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कैरीचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांनी कमी झाले आहेत.
गेल्या आठवड्यात ८ क्विंटल आवक असलेल्या कैरीची आवक वाढून ती या आठवड्यात २५ क्विंटलवर पोहचली आहे. आवक वाढल्याने कैरीचे भाव ३००० रुपये प्रती क्विंटलवरून या आठवड्यात १३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.
लिंबूच्या भावातही वाढ सुरूच असून गेल्या आठवड्यात ४९०० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर ५००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. लिंबूसह अद्रक व भाज्यांचे दरही वाढतच आहे. अद्रकचे दर हे २५०० ते ६५०० इतके झाले आहे. कांद्याच्या दरात फारसा फरक पडला नसून ३०० ते ६५० असा दर कांद्याला मिळत आहे.
पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाजी वर्गातील गिलके हे सर्वाधिका महाग अर्थात ६५०० रुपये क्विंटल दरावर पोहचले आहे, त्या खालोखाल कारले ५००० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.
सध्या इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बीट १७००, शेवगा २०००, बटाटे ५०० ते ११००, भेंडी १००० ते २५००, गंगाफळ ८०० ते १४००, गाजर ६०० ते ११००, खिरा ६०० ते १५००, पानकोबी ७०० ते १२००, मेथी २००० ते ५०००, पालक १३००, टमाटा ५०० ते १०००, वांगे ८०० ते २२००, हिरवी मिरची २००० ते ५०००.