मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:28 PM2018-08-22T17:28:07+5:302018-08-22T17:28:44+5:30
जामनेर तालुका : शेवगा धरण पूर्ण भरले
जामनेर, जि.जळगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील काही मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसाठा झाला आहे. संततधार पावसाने शेतातून पाणी वाहून निघाल्याने विहिरींच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
आठ दिवसानंतर बुधवारी सकाळी सूर्यदर्शन होऊन उन पडले. दिवसभर उन-सावलीचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता.
पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी बैलजोडीसह शेताकडे जाताना दिसत होते. बहुतेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचलेले असल्याने ते बांधाबाहेर काढण्याचे काम शेतकरी व शेतमजूर करीत होते.
मध्यम प्रकल्पातील जलसाठा
शेवगा- ९९.९८, माळपिंप्री- २८.९२, महुखेडा- ४४.९४, लहासर- २४.६४, गोंडखेळ- ४८.८५, चिलगाव- ३७.१८, तोंडापूर- २०, हिवरखेडे- ३५, पिंप्री ल.पा.- ८० व गोद्री ल.पा. ३० टक्के.