जळगावात भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटोचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:40 AM2018-11-02T11:40:12+5:302018-11-02T11:40:37+5:30
फळे,भाजीपाला : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या भावात २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलने घट होऊन लाल टोमॅटो ७०० ते १२०० रुपये प्रति क्विंटलवरून ४०० ते १००० रुपये प्रति क्विंटलवर आले. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले.
दोन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मात्र, या आठवड्यात आवक वाढून भाव थेट २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले. गेल्या आठवड्यात ५०० ते १४५० रुपये प्रति क्विंटल
कांद्याचे भाव कमी होऊन ते ३५० ते १००० रुपये प्रति क्विंटलवर आले. कोथिंबीरचेही भाव कमी होऊन ते १३०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.