तीन महिन्यात वाढविले ९ रुपये, कमी केले २१ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:25+5:302021-04-04T04:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून सातत्याने इंधन दरात वाढ होत आहे. जानेवारी महिन्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून सातत्याने इंधन दरात वाढ होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलचा दर ९१.५८ रुपये प्रति लीटर होता. तर तोच दर मार्च महिन्यात ९८.२५ वर गेला होता. आता गेल्या तीन महिन्यात सरकारने पेट्रोलच्या दरात ९ रुपयांनी वाढ केली तर गेल्या पाच दिवसात हीच वाढ फक्त २१ पैशांनी कमी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डिझेल आणि घरगुती गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकही वैतागले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर तीनच महिन्यात तब्बल ९ रुपयांनी वाढल्याने नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. इंधनाबरोबरच वाहतूक दरदेखील वाढले आहेत. त्याचा परिणाम म्हणून बाजारात सर्वच वस्तुूचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता सरकारने ३० मार्चला २१ पैशांनी पेट्रोलच्या दरात तर डिझेलच्या दरात २३ पैशांनी कपात केली आहे.
२१ पैसे कमी केल्याने किती फायदा
एका लीटरमध्ये २१ पैसे कमी केल्याने असा कितीसा फायदा नागरिकांना मिळणार आहे. सरकारला जर खरोखरच कोरोनाच्या काळात महागाई कमी करायची असेल, तर सरकारने मोठी कपात करावी. आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे मत नागरिक व्यक्त करीत आहे.
कोट - २१ पैसे पेट्रोलचा दर कमी झाला आहे. तो इतका कमी आहे की त्याचा फारसा फरक आम्हाला जाणवलाच नाही. गेल्या काही महिन्यात ९ ते १० रुपयांनी वाढ केल्यावर २१ पैसे कमी करून काय मिळवणार आहे. - राहुल पाटील
पेट्रोलचे दर कमी करायचेच असतील. तर सरकारने जास्त कपात करावी. त्यामुळे त्याचा थेट फायदा सामान्यांना होईल. काही पैशांनी दर कमी करून फायदा होणार नाही. - सचिन पवार
३० मार्च पासून
९८.०२ पे ट्रोल
८७.६३ डिझेल
२९ - मार्च
९८.२३ पेट्रोल
८७.८६ डिझेल
१ जानेवारी -
९१.५८ पेट्रोल
८०.५१ डिझेल
१ फेब्रुवारी
९४.०६ पेट्रोल
८३.२० डिझेल
१ मार्च
९८.६१ पेट्रोल
८८.२५ डिझेल