भुसावळ येथे वाढती रुग्ण संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:38 PM2020-07-16T13:38:46+5:302020-07-16T13:39:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहर व तालुक्यातील पुन्हा 32 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात भुसावळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : शहर व तालुक्यातील पुन्हा 32 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात भुसावळ येथे तब्बल 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले आहे . यात बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या 25 पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ येथे आतापर्यंत बंदोबस्तासाठी आलेल्या एकूण 48 पोलिसांना कोरोणाचाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रात्री अकरा वाजता आलेल्या अहवालामध्ये बाजारपेठ पोलिस स्टेशनचे तेवीस पोलीस , जुना सातारा 1, तापी नगर 2, हातनुर 4 , वरणगाव 1, येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे भुसावळ येथे एकूण रुग्णांची संख्या 633 झाली आहे. बाजारपेठ पोलिस स्टेशनचे यापूर्वी 15 पोलिसांचा अहवाल पॉझिटिव आला होता. 14 कर्मचारी उपचार घेऊन तब्येत सुधारली होती. तर एका पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे त्. यानंतर बंदोबस्तासाठी आलेल्या जळगाव येथील दोन व औरंगाबाद येथील 12 पोलिसांचा अहवालही पॉझिटिव आला होता . त्यामुळे भुसावळ येथे बंदोबस्तासाठी आलेल्या तब्बल 48 पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.